- कोरोनाच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये निसर्गाने टाकली कात…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अडकलेले आहे. त्यामुळे शहराचे एकूण वातावरण हे पर्यावरणास अनुकूल झालेले दिसून येत आहे. निसर्गाला सुद्धा त्याची कूस बदलण्याकरिता वेळ मिळाला आहे. हे बदल आता प्रकर्षाने दिसून येत आहेत.
प्राधिकरण परिसरातील गुलमोहराची झाडे अतिशय मनमोहक फुलांनी भरून गेली आहेत. नारिंगी लाल रंगाचे फुले लक्ष वेधून घेत आहेत. चाफ्याची झाडे सुद्धा फुलांनी भरून गेलेली आहेत. सकाळच्या वेळेत कोकिळेचा मंजुळ स्वर आनंदाचे वातावरण निर्माण करीत आहे.
पर्यावरण अभ्यासक व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” गेल्या वर्षभरामध्ये प्राधिकरण परिसरातील कोकिळेच्या संख्येत तिपटीने वाढ नोंदली गेली आहे. समितीच्या विजय मुनोत,संतोष चव्हाण,रुपाली पाटील,अर्चना घाळी,सतीश देशमुख,विजय जगताप या पर्यावरण अभ्यासकांच्या अभ्यासगटाने केलेल्या निरीक्षणात सदरची महत्वपूर्ण बाब समोर आलेली आहे. अनेक दिवसातून जमिनीवरील हिरवळीवर कोकिळा मनसोक्त बागडताना दिसून येत आहेत. लॉकडाऊन तसेच कोरोना कठीण काळात सदरची आल्हाददायक बाब मनाला नक्कीच आनंदाचा स्पर्श देऊन जात आहे.