- १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे उद्या लसीकरण बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात आज मंगळवारी नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, डोळ्यांचे हॉस्पिटल-मासुळकर कॉलनी, पिंपळे निलख पी.सी.एम.सी स्कुल, नवीन आकुर्डी रुग्णालय व आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी या आठ लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी १६०० नोंदणी केलेल्या नागरीक/लाभार्थ्यांपैकी १५६० लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.
तसेच आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शासनाकडून फक्त ‘ कोविशिल्ड ’ लस १५५०० डोस प्राप्त झालेले आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या (दि. १२) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.
फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस देण्याची कार्यवाही सकाळी १०.०० ते ५.०० या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे. तरी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.


















