- मुख्यमंत्री निधीसाठी एक लाखाचा धनादेश अजित पवारांकडे सुपूर्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढ झाली आहे. राज्य सरकारवर कोरोनाच्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आर्थिक भार पडला आहे. प्रत्येक व्यक्ती, संस्था या कामात पुढाकार घेऊन आपापल्या परीने मदत करीत आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी या कामात पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करत एक लाख रुपयाचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे, मयूर कलाटे, नगरसेवक प्रवीण भालेकर आदी उपस्थित होते. इतरांनी सुद्धा अशा संकटाच्या काळात नागरिकांच्या उपचारासाठी मदत उभारावी, असे आवाहन भालेकर यांनी केले.
















