- वैद्यकीय व्यवस्थेवरील ताणही होतोय कमी..
- हाउसफुल बेड होऊ लागले रिकामे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाची भयावह परिस्थिती मे महिन्यांपासून नियंत्रणात येऊ लागली आहे. दैनंदिन बाधितांची संख्या दीड ते दोन हजारांच्या आसपास आहे. तसेच, होम आयसोलेट होऊन घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. परिणामी, शहरातील रुग्णालयात बेड रिकामे असून, रुग्णालयावरील ताण काहीसा कमी झाल्याचे दिलासायक स्थिती आहे.
रुग्णालयांतून दररोज दीड ते दोन हजार रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. तसेच, घरीच राहून उपचार घेणाऱ्यांची संख्या १५ हजारांच्या पुढे आहे. परिणामी, महापालिका व खासगी रुग्णालयांतील बेड सध्या रिकामे आहेत, असे महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेडी यांनी सांगितले.
महापालिकेच्या रुग्णालयात एकूण ४ हजार ९१५ बेड आहेत. त्यापैकी ३ हजार १५१ बेडवर रुग्ण असून, १ हजार ७६४ बेड रिकामे आहेत. खासगी कोरोना रूग्णालयात एकूण ५ हजार ९६७ बेडची क्षमता आहे. त्यापैकी ३ हजार १५७ बेडवर रुग्ण उपचार घेत असून, २ हजार ८१० बेड रिकामे आहेत. पालिका व खासगी रुग्णालयांतील एकूण १० हजार ८८२ पैकी ६ हजार ३०८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, ४ हजार ५७४ बेड रिक्त आहेत. त्यात कोविड केअर सेंटरमधील १ हजार ७६४ बेड, ऑक्सिजन नसलेले १ हजार २९२, बेड, ऑक्सिजनचे १ हजार ४०४ बेड, आयसूयीचे १०४ बेड आणि व्हेटिलेटरचे १० बेड रिकामे आहेत.