- ११ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सुपूर्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मे. २०२१) :- चिंचवड देवस्थान ट्रस्टने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज (शुक्रवारी) दिला आहे. याबाबतची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली. सह – धर्मदाय आयुक्त व विश्वस्त मंडळाच्या हस्ते रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आला.
सह- धर्मदाय आयुक्त सुधीर बुके पुणे विभाग यांनी जिल्ह्यातील धार्मिक संस्थांना कोव्हीडसाठी आर्थिक मदतीने आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निधी देण्यात आला.
याप्रसंगी सह- धर्मदाय आयुक्त सुधीर बुक्के, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार आदी उपस्थित होते.
















