- आरोपीकडून विवाहितेवर लैंगिक अत्याचार; भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मे. २०२१) :- ‘तू मला आवडतेस. मी तुझ्याशी लग्न करणार आहे. तू नवऱ्याला सोडचिठ्ठी दे. नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला आणि मुलाबाळांना सोडणार नाही. त्यांना खल्लास करून टाकेल,’ अशी धमकी दिली. फिर्यादी पिडित महिला आणि आरोपी याची कामाच्या ठिकाणी ओळख झाली होती. आरोपी फिर्यादी यांच्या घराजवळच्या परिसरात राहत होता. त्याने पिडित महिलेशी ओळख वाढविली.
दोन महिन्यांपूर्वी फिर्यादी विवाहिता घरात एकट्याच असताना आरोपी तिथे आला. त्याने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी विवाहितेने आपल्याशी लग्न करावे यासाठी आरोपी हा फिर्यादी यांना एका वकीलाकडे घेऊन गेला. ‘आपला नवरा मारहाण करतो, पैसे मागतो’, असे वकीलांना स्वतःच्या हस्तक्षरात स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून देण्यास आरोपीने भाग पाडले.
ही घटना दोन महिन्यांपूर्वी बोपखेल येथे घडली. याबाबत पिडित विवाहितेने गुरुवारी (दि. १३) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सलमान नूरआलम शेख (वय ३०, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















