- ‘कोविशिल्ड’च्या दुसऱ्या डोससाठी ८४ ते ११२ दिवसांची अट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका लसीकरण केंद्रावर आज १८८५ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या (दि. १५) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना १५ मे २०२१ पासून ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ ते ११२ दिवस) देण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने उद्या दि.१५/०५/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘ कोविशिल्ड चा ’ पहिला व दुसरा डोस लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर १०० डोस उपलब्ध असणार आहेत. वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.
लसीकरण केंद्र….
यमुनानगर रुग्णालय.
तालेरा रुग्णालय.
सावित्रीबाई फुले शाळा, भोसरी.
नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी.
आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ.
खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव.
नवीन आकुर्डी रुग्णालय.
आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ.