- दोन्ही रुग्णालयांत लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था..
- स्थायीने मागितला सुधारित प्रस्ताव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने सांगवी व भोसरीत प्रत्येकी ४०० बेडचे जम्बो रूग्णालय उभे करण्यात येत आहे. तिसरी लाट लक्षात घेऊन या रुग्णालयांत लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. स्थायी समिती सभेत यासंदर्भातील ३ प्रस्ताव प्रशासनाकडून मागे घेण्यात आले. नवीन सुधारित प्रस्ताव पुढील सभेत सादर केला जाणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर अधिक परिणाम होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
भोसरी व सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानात एकूण ८०० बेडचे जम्बो रूग्णालय पालिका उभारणार आहे. रुग्णालयात लहान मुलांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थायी समितीसमोर असलेले विविध तीन प्रस्ताव प्रशासनाकडून मागे घेण्यात आले.