- पिं. चिं. शहराचे कोरोनामुक्तीकडे पहिले पाउल..
- शहरात आज ९५९ जणांना बाधा; ४४ रुग्णांचा मृत्यू तर, २१०५ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १५) रोजी ९५९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २१०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २४०८२० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २१७७९१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३६०६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४४ एवढी आहे.