- पैसे भरा अन्यथा घर खाली करा; यादीतील नाव कायमस्वरुपी होणार रद्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जे एन एन यु आर एम अभियानांतर्गत राबविणेत येत असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी से नं. १७ व १९ चिखली प्राधिकरण मधील घरकुल योजनेतील प्राधान्य यादीतील लाभार्थीनी उर्वरित स्वहिस्सा र.रु .३,२६,००० / भरलेला नाही, त्यांना ३१ मे २०२२ पर्यंत रक्कम भरणेसाठी आयुक्त राजेश पाटील यांनी मुदतवाढ दिली आहे.
लाभार्थ्यांनी २१ मे २०२१ पर्यंत उर्वरित स्वहिस्सा र.रु .३,२६,००० / – भरावा अन्यथा त्यांचा लाभ रदद करणेत येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुदतीनंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच घरकुल लाभार्थी यांचा घरकुल योजना अर्ज दफ्तरी दाखल करणेत येऊन घरकुल मिळणेबाबतचा हक्क मुदतीनंतर संपुष्टात येईल.
तदनंतर कोणतीही तक्रार विचारात घेणेत येणार नाही व घरकुल योजनेतील यादीतील नाव कायम स्वरुपी रद्द करून पुढील प्रतिक्षा यादीतील लाभार्थीचा विचार करणेत येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.


















