- त्यांच्या अकाली जाण्याने चिंचवडेनगर परिसरात हळहळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- चिंचवडेनगर येथील सौ. उषा बापूसाहेब गोरे (वय ४२) यांचे शुक्रवार (दि १३) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे सासू, पती व दोन मुले असा परिवार आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव व महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्राचे प्रमुख बापूसाहेब गोरे यांच्या त्या पत्नी होत. चिंचवड परिसरात त्यांचा माहिलावर्गात दांडगा जनसंपर्क होता. “उषाताई” या नावाने त्या “परिचित” होत्या. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.