- ‘कोविशिल्ड’ ५००० व ‘कोव्हॅक्सिन’ २००० लसीचे डोस पालिकेला प्राप्त..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शासनाकडून ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लस उपलब्ध झालेली आहे. महापालिकेकडे आज मंगळवारी (दि. १८) रोजी ‘कोविशिल्ड’ लस ५००० डोस व ‘कोव्हॅक्सिन’ लस २००० डोस उपलब्ध आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन्ही लस वय वर्षे ४५ पुढील ज्या नागरिकांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना १५ मे २०२१ पासून ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे.
तसेच ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या नागरिकांना देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उद्या (दि. १९) रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर १५० डोस उपलब्ध असणार आहेत.
यमुनानगर रूग्णालय
प्राथमिक शाळा-९२ मोरे वस्ती, म्हेत्रेवस्ती
तालेरा रुग्णालय
प्रेमलोक पार्क दवाखाना
सावित्रीबाई फुले शाळा, भोसरी
नवीन भोसरी रुग्णालय
नवीन जिजामाता रुग्णालय
अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर
आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालयजवळ
मासुळकर कॉलनी, आय हॉस्पीटल
खिंवसरा पाटील रुग्णालय, थेरगाव
पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि.निलय दवाखान्या जवळ
नवीन आकुर्डी रुग्णालय
इ.एस.आय.सी. हॉस्पीटल मोहननगर चिंचवड
पिंपळे गुरव माध्यमिक शाळा
कासारवाडी दवाखाना
तसेच उद्या (दि. १९) रोजी ‘कोविशिल्ड’ चा पहिला व दुसरा डोस वय वर्षे ४५ वर्षापुढील लाभार्थ्यांना शहरातील तब्बल ५० लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहे. ‘ कोविशिल्ड ‘ चा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवड्याच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यंत) कालावधी पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० डोस उपलब्ध असणार आहेत.
शासनाने दिलेल्या लेखी मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या बुधवारी (दि.१९) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही.


















