- झाकण गायब झाल्याने चेंबर उघड्या अवस्थेत..
- त्वरित झाकण बसवा; विवेक तापकीरांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या तापकीर चौकात रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरचे झाकण गायब झाल्याने अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. मुख्य मार्गावर हे चेंबर आहे. त्यात वाहने पडून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.
ही गंभीर बाब हेरून काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर यांनी पालिका आयुक्तांकडे या रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरचे झाकण तत्काळ बसविण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या या मार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. मुख्य मार्गावरील चेंबरचे झाकण गायब झाल्याने चेंबर उघड्या अवस्थेत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. हे झाकण एक तर चोरीस गेले असावे किंवा ते काढून टाकले असावे. हे वर्दळीचे ठिकाण असल्याने येथे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे चोरी होणार नाही, अशा पद्धतीने नवीन झाकण या चेंबरला बसवण्यात यावे.


















