- वायसीएम रुग्णालयात मेडिकल कॉलेजच्या उभारणीची होतेय मागणी..
- पालिका आयुक्त, नगरसेवक व स्थायीच्या पुढाकाराची गरज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात मेडिकल कॉलेज (MBBS, BAMS इ. साठी) तातडीने सुरु करण्यात यावे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ व तज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील. नागरिकांनाही चांगली आरोग्य सेवा मिळेल.
सद्यस्थितीत एका डॉक्टरमागे किमान पाच नर्सेची आवश्यकता आहे. नर्सिंगसाठी डिप्लोमा कोर्सही कमी फीमध्ये तातडीने सुरु करावा. त्यामुळे अधिकाधिक डॉक्टर व नर्सेसची उपलब्धता होईल. नागरिकांना खासगी महागड्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. आरोग्य विषयक आणीबाणी रोखण्यासाठी, कमी मृत्यूदर राखण्यासाठी पालिकेची आरोग्यव्यवस्था देखील सज्ज होईल.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मेडिकल कॉलेजसाठी तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांची बदली झाल्यानंतर पालिकेने फक्त पदव्युत्तर पदवी (Post Graduate) कोर्स सुरु केला. सध्या शहराला मजबूत आरोग्य व्यवस्थेची गरज आहे त्यासाठी वायसीएम रुग्णालयात मेडिकल कॉलेजची उभारणी होणे गरजेचे आहे. पालिका आयुक्त, नगरसेवक व स्थायी समितीने यासाठी पुढाकार घेऊन तातडीने आदेश काढून कामाला सुरुवात करावी.
– सचिन गोडांबे, सामाजिक कार्यकर्ता…


















