न्यूज पीसीएमसी नेटवर्क
जुन्नर प्रतिनिधी (दि. २८ डिसें.) :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका व राजुरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी, महिला, शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरी गावचे सरपंच संजय गवळी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड, पं. स. माजी सभापती दिपक आवटे, आ. भा. ग्राहक पंचायत प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी. तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमेश गोडे, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या व्यवस्थापिका अनघा गद्रे, आरोग्य समिती प्रमुख डॉ. अशोक काळे, गटशिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे, महावितरण कार्यकारी अभियंता मठपती, प्रकल्प अधिकारी रविंद्र तळपे, राजुरीचे उपसरपंच चंद्रकांत जाधव, तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, कौसल्या फापाळे, वैशाली अडसरे, एम डी घंगाळे, एकनाथ शिंदे, जनता विकास मंडळ अध्यक्ष सतीश पाटील, सुदाम औटी आदी उपस्थित होते.
यावेळी काही सेवा संस्थाचा गौरव करण्यात आला. आदर्श शेतकरी जयसिंग वायकर, साईगणेश महिला बचत गट, पशु संवर्धन सहायक आयुक्त डॉ बाळकृष्ण घंगाळे, रोटरी क्लब आळेफाटा, प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा, प्रा. अरुणा वाघोले, विशेष सत्कार आदर्श गाव राजुरी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प नारायणगाव यांचा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रस्ताविक ह. भ. प. विशाल महाराज हाडवळे यांनी केले, सुत्रसंचालन प्रा अरुणा वाघोले व आभार अर्जुन हाडवळे यांनी मानले.















