- ३५ हजारांचा दंड वसूल; एमआयडीसी भोसरी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या ७० नागरिकांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली.
पीसीएनटीडीए सर्कल, मोशी प्राधिकरण, मोशी येथे मॉर्निंग वॉकनिमित्त घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. अशा ७० नागरिकांना पोलीस ठाण्यात आणून कोरोना रोखण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कठोर निर्बंधांचे महत्व पटवून देण्यात आले.


















