- पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता यांच्या आश्वासनानंतर संतोष सौंदणकर यांचे उपोषण मागे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल काॅन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे कार्यध्यक्ष, विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी गुरुवार (दि. २७) रोजी दुपारी उपोषण मागे घेतले असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
महावितरण मधील भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे सौंदणकर यांच्या न्यु. सिमरन एन्टरप्रायझेस या फर्मचा विदयुत ठेकेदारीचा परवाना रद्द केला होता. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी सौंदणकर बुधवार (दि. २६) रोजी सकाळी उपोषणास बसले होते. शिवसेनेच्या स्टाईलने केलेल्या उपोषणास भरघोस पाठिंबा पाहता महावितरण प्रशासनाने नांगी टाकली. सौंदणकर यांचा रद्द केलेला परवाना पुनर्बहाल केला जाईल, असे आश्वासन दिले.
सौंदणकर म्हणाले की, मि जनतेच्या प्रश्नासाठी महावितरण विरोधात भांडतो. परिणामी माझ्यावर खोटे आरोप करून दबाव आणून माझा परवाना रद्द केला. लोकप्रतिनिधी म्हणून न्याय मिळविण्यासाठी नेहमी आग्रही राहिलो. प्रशासनाने आपले अपयश झाकण्यासाठी उलट माझ्यावरच आरोप केले. मात्र, माझा शिवसेना पक्ष व ठेकेदार बांधव माझ्या पाठीशी उभे राहिले. शेवटी सत्याचा विजय झाला. भ्रष्टाचार किंवा प्रशासनाचा काळा बाजार उघडकीस आणणे गुन्हा असेल तर, हा गुन्हा वारंवार करीत राहील, असा इशाराही सौंदणकर यांनी दिला आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी सुलभा उबाळे (पुणे जिल्हा प्रमुख), गजानन थरकुडे (संपर्क समन्वयक,पुणे शहर), संजय मोरे (उपशहर प्रमुख पुणे), विद्युत सनियंत्रण समिती सदस्य विश्वास ननावरे, नितीन बोंडे (सचिव), जावेद मुजावर (उपाध्यक्ष), दिंगबर बोबडे, अरुण बडगुजर, संजय मोरे, आकाश भराटे, शशीकला उभे (शिवसेना उपशहर संघटिका म.आ), जितेंद्र ननावरे (शहर संघटक पिंपरी विधानसभा), किरण मोटे (समन्वयक पिंपरी विधान सभा) सतीश मरळ (शिवसेना विभाग प्रमुख निगडी), गजानन पंडित (शहर संघटक पुणे), सुधाकर नलावडे (माजी विभाग प्रमुख काळेवाडी), राजेश मोरे (शिवसेना विभाग प्रमुख पुणे), चंद्रकांत अंबिलवादे, नानासाहेब निकम, भालचंद्र सावंत, जनाबाई गोरे, प्रदिप बेळगांवकर (माजी उपविभाग प्रमुख निगडी) व शिवसेनेचे इतर पदाधिकारी, पिपंरी चिंचवड इलेक्ट्रिकल काॅन्ट्रॅक्टर असोसिएशन, पुणे जिल्हा इलेक्ट्रिकल काॅन्ट्रॅक्टर असोसिएशन, इलेक्ट्रिकल काॅन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे पदाधिकारी, सभासद, अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार व तगडपलीवार यांच्या समोर रद्द केलेला विदयुत ठेकदारीचा सरकारी परवाना दोन दिवसांच्या आत पुर्ववत चालु करुन देतो व इतर मागण्या आठ दिवसात मान्य करतो, असे आश्वासन महावितरणच्या पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर ४.३० वा संतोष सौंदणकर यांनी उपषोण मागे घेतले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.










