- कोविड काळातील भत्त्यापासूनही वंचित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत मानधनावर कार्यरत असणाऱ्या व सध्या न्यायालयामध्ये दावा दाखल केलेल्या परिचारिका व कर्मचाऱ्यांना किमान वेतन दरानुसार वेतन देण्याचा ठराव करण्यात आला आहे.
स्थायी समितीकडून त्याला मंजुरीदेखील मिळाली. मात्र, पूर्वी अनुभव पाहून वेतन ठरले होते. मात्र, नव्या ठरवामुळे २ हजार रुपये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे परिचारिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
वैद्यकीय अधिकारी व इतर तांत्रिक संवर्गातील पदे पालिकेने हंगामी पध्दतीने भरण्यात आली होती. यामधील काही परिचारिका व कर्मचारी यांनी कायमस्वरूपी करण्याबाबत न्यायालयात दावा केला आहे. कोरोना परिचारिकांना २ हजार रुपये भत्ता जाहीर झाला. मात्र तो देण्याऐवजी त्यांच्या वेतनातून २ हजार कपात करण्यात आली. आहे.


















