- पालकमंत्र्यांच्या कोट्यातून आयुक्तालयाला २७ दुचाक्या व २१ चारचाकी वाहने..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे अपऱ्या संख्येने वाहने असल्याने गस्तीसाठी अडचणी येत होत्या. तसेच नव्याने कार्यान्वित केलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनच्या पोलिसांना वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यासाठी २७ दुचाकी तसेच २१ चारचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत.
कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गस्तीवर भर दिला. मात्र, आयुक्तालयाकडे वाहनांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे वाहन खरेदीसाठी अनुदानाची मागणी केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अनुदानातून दोन कोटी रुपये वाहन खरेदीसाठी देण्यात आले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक अबरार सय्यद यांनी वाहनांची आवश्यकता असल्याबाबतचे पत्र तयार करून राज्याच्या गृहविभागाकडे प्रस्ताव पाठविला होता.


















