- तिघांवर चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. मे. २०२१) :- ‘ई टू शॉपी’ने ‘ओएलएक्स’वर पुणे जिल्ह्यासाठी डिलरशीपसाठी जाहीरात दिली होती. डिलरशीप मिळवून देतो असे आमिष दाखवून सिक्युरिटी पोटी पंचवीस हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले होते.
दरम्यान, इंडिया शॉपिंग बाजार’च्या वतीने देखील अशीच जाहीरात देण्यात आली होती व आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून सिक्युरिटी पोटी ७५ हजार रुपये घेतले होते. एकूण एक लाख रुपयांची फसवणूक तरुणाची करण्यात आली. ही घटना ऑगस्ट २०२० ते जानेवारी २०२१ या दरम्यान घडली.
प्रतिक प्रविण कांकारिया (वय ३०, रा. सुखवानी उद्यान सोसायटी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा ठाकुर व अनुश्री पाटीदार व सुजल पटवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

















