- कोव्हॅक्सिनसाठी १६ तर, कोविशिल्डसाठी ४९ लसीकरण केंद्रे..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शासनाकडून ‘कोविशिल्ड ’व‘ कोव्हॅक्सिन’ लस उपलब्ध झालेली आहे. उद्या (दि.२६) रोजी पालिकेच्या १६ लसीकरण केंद्रावर वय वर्षे ४५ पुढील नागरिकांना सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थीच्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
कोव्हॅक्सिनसाठी १६ लसीकरण केंद्र…
१ यमुनानगर रुग्णालय
२ प्राथमिक शाळा -९२ मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती
३ तालेरा रुग्णालय
४ प्रेमलोक पार्क दवाखाना
५ सावित्रीबाई फुले शाळा भोसरी
६ नवीन भोसरी रुग्णालय
७ नवीन जिजामाता रुग्णालय
८ अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर
९ आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ
१० मासुळकर कॉलनी आय हॉस्पीटल
११ खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव
१२ पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्या जवळ
१३ नवीन आकुर्डी रुग्णालय
१४ इ.एस.आय.एस. हॉस्पीटल मोहननगर चिंचवड
१५ पिंपळे गुरव माध्यमिक शाळा
१६ कासारवाडी दवाखाना
तसेच लसीकरण केंद्रावर पुर्वी ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसापर्यत पूर्ण झालेले आहे, अशांना देण्यात येणार आहे.
या अनुषंगाने उद्या दि.२६/०५/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ४९ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
महापालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

















