न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात राहत्या घरासमोर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दुचाकी पार्क केली होती. ही दुचाकी रविवारी सकाळी सातच्या सुमारास चोरीस गेल्याचे दिसून आले. मुक्तार अहमद सन्नाउल्ला खान (वय २७, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टाटा मोटर्स कंपनीच्या मेन गेटसमोरील पार्किंगमध्ये ३० मार्च रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास दुचाकी पार्क केली होती. दुपारी सव्वातीनच्या सुमारास दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. पार्वती माणिक रहाटकर (वय ३०, रा. चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आळंदी रोड, भोसरी येथील मंगलमूर्ती मेडिकल समोरील सार्वजनिक रस्त्यावर २७ मार्चला रात्री आठच्या सुमारास दुचाकी पार्क केली होती. त्यानंतर खरेदीसाठी गेले. खरेदी संपवून अर्ध्या तासानंतर परतले असता दुचाकी चाेरीला गेल्याचे उघडकीस आले. सचिन शिवराम बोऱ्हाडे (वय ३८, रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.