- हॉटेल्स, रेस्टॉरंटसह १८ ठिकाणच्या आस्थापना पोलिसांकडून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२१) :- हिंजवडी आयटी पार्क परिसरात कठोर निर्बंध लागू केलेले असतानाही नियमांचे उल्लंघन केलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्काबार, दारूचे दुकान अशा १८ ठिकाणच्या आस्थापना पोलिसांनी मंगळवारी (दि. २५) सील केल्या आहेत. पोलिसांनी आस्थापना सील करणेबाबतचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर केला. तहसीलदारांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी ही धडक कारवाई केली.
यात हिंजवडी परिसरातील मोफासा हॉटेल (ऑक्सफर्ड रोड, खंडोबा मंदीर जवळ, बावधन), हॉटेल रुडलाऊंज (हिंजवडी), हॉटेल ठेका रेस्टो अँड लॉज (भुमकर चौक ते हिंजवडी रोड, हिंजवडी), हॉटेल अशोका बार अँड रेस्टो (जयरामनगर, शिवाजी चौक, हिंजवडी), हॉटेल बॉटमअप (भटेवरा नगर, हिंजवडी), श्री चायनिज अँड तंदुर पॉईंट (माण), महाराष्ट्र हॉटेल भोजनालय, चायनिज (बुचडेवस्ती, मारुंजी), हॉटेल शिवराज (पुनावळे), कविता चायनिज सेंटर (शिवार वस्ती, मारुंजी), हॉटेल पुणेरी (बावधन), हॉटेल आस्वाद (इंदिरा कॉलेजजवळ, हिंजवडी), हॉटेल ग्रीनपार्क स्टॉट ऑन (भुंडे वस्ती, बावधन), फॉर्च्युन डायनिंग एल.एल.पी. उर्फ ठिकाणा हॉटेल (व्हाईट स्क्वेअर बिल्डिंग, हिंजवडी), हॉटेल टिमो, चांदणी चौक (बावधन), वॉटर-९ मल्टीक्युझिन रेस्टॉरंट अँड लंच (बावधन खुर्द, पौड रोड, जुना जकात नाका, बावधन), एस.पी. फॅमिली रेस्टॉरंट (हिंजवडी ते कासारसाई रोड, कासारसाई), योगी हॉटेल (पुणे बेंगलोर हायवे शेजारी, ताथवडे), यश करण बिअर शॉपी (हिंजवडी) या कारवाई केलेल्या आस्थापनांचा समावेश आहे.