- चिंचवडमधील घटना; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२१) :- स्वतःच्या गॅरेजसमोर उभे असताना आरोपी त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी आला. आरोपी दारू प्यायला बसणार हे कळाले. म्हणून त्यांनी इथे दारू प्यायला बसू नका असे सांगितले. परंतु आरोपींनी मनमानी करत फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यांच्यातील एकाने गुप्त अंगावर लाथ मारली. तर तिघांनी मिळून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
धिरज ट्रक बॉडी बिल्डर, रामनगर, चिंचवड येथे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. चुन्नुलाल सुखारी शर्मा (वय ५२, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लाला अशोक शिंदे, बाळू अशोक शिंदे (दोघेही रा. रामनगर, चिंचवड) व त्यांचे दोन मित्र (नाव, पत्ता माहीत नाही), यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरी पोलीस तपास पुढील करत आहेत.