- स्थानिकावर फिर्यादीने दाखल केला गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२१) :- वाल्हेकरवाडीत फिर्यादीच्या मालकीच्या क्षेत्रात अतिक्रमण करून त्यातील २५ लाख रुपये किमतीची आंबा, फणस, चिकू, बाभूळ व इतर छोटी मोठी झाडे विनापरवाना तोडून त्यांची चोरी करून विक्री केली.
२० मार्च २०२१ रोजी हा प्रकार उघडकीस आला. नितीन दत्तात्रय चिंचवडे ( वय ५८, रा. कोथरूड, पुणे) यांनी या प्रकरणी मंगळवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विजय विठ्ठल चिंचवडे व शरद विठ्ठल चिंचवडे (दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अशी आरोपींची नावे आहेत. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.