- व्याजाने पैसे दिलेल्या सावकाराची एकाला धमकी व मारहाण..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२१) :- गजा मारणे कोण माहिती आहे का? यांची मिरवणुक आम्हीच काढली होती, शितोळेचे हात कोणी तोडले माहित आहे का? अशी धमकी देऊन मारहाण करणाऱ्या सावकारीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादीने २०१८ मध्ये आरोपीकडून १० टक्के व्याजाने ४० हजार रुपये घेतले होते. त्याचे व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाहीत. तसेच मुद्दलाची रक्कम परत द्यावी. यासाठी आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करुन घरात कोंडून ठेवले. तुला आता येथेच कोंडुन ठेवतो़, तुझे तंगडे तोडतो, असा दम देऊन त्यांना मारहाण केली.
या प्रकरणी श्रीराम किनगे (वय ५२, रा. पवारनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रविण बबन थोरात (वय ३४, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

















