- ग्राहकाकडून ४३ लाख लाटले; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे. २०२१) :- फिर्यादीने नोव्हेंबर २०१६ मधे आंगण उष:काल सोसायटी, जुनी सांगवी याठिकाणी २ बीएचके फ्लॅट खरेदी केला, त्याचा ताबा ऑगस्ट २०१७ मध्ये मिळणार होता. त्यासाठी आरोपी बिल्डरला वेळोवेळी ४३ लाख रुपये दिले.
मात्र, आजपर्यंत फ्लॅट ताबा न देता फसवणूक केली. याप्रकरणी सॅम्युएल प्रकाश राव (वय ४१, रा. जुनी सांगवी) यांनी गुरुवारी (दि.२७) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सी ॲन्ड सी निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरचे रवींद्र सुधाकर चव्हाण (रा. धायरी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















