- मालकाचा सुरक्षारक्षकावर संशय; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे. २०२१) :- चिंचवडमधील कृष्णानगर येथे २३ ते २७ मे दरम्यान फिर्यादीच्या दरवाजाचे लॅचलॉक तोडून चोरट्याने ५ लाख ९० हजार ७०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रुद्राक्ष माळा व विविध स्टोन्स चोरी केले. सुरक्षारक्षकाने ही घरफोडी केल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी रमेश बबुराम चव्हाण (वय ५४, रा. साईचंद्र इन्क्लेव्ह, कृष्णानगर, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. २८) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरक्षारक्षक आयुष याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.