न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर उद्या बुधवारी (दि. २ जून) रोजी ‘कोविशिल्ड’ लस नागरिकांना देण्यात येणार आहे.
ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) घेतला आहे अशांना देण्यात येणार आहे.
या अनुषंगाने फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा डोस २४ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
















