न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्वानांचा व डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषकरून काळेवाडी-विजयनगर व नढेनगर परिसरात मोकाट श्वान व डुकरांचा उपद्रव वाढला असून, याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महिला, बालक व रात्रीच्या वेळी पादचा-यांवर, दुचाकी स्वा-यांवर कुत्र्यांकडून हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांमध्ये नागरिक जखमीही होत आहेत.
याबाबत शिवसेनेचे युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विभागप्रमुख गोरख पाटील, उपविभागप्रमुख सागर शिंदे व आदींनी आयुक्त कार्यालयास भेट दिली असून, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन दिले आहे. प्रशासनाने तात्काळ काळेवाडी-विजयनगर व नढेनगर परिसरातील मोकाट श्वान व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी केली आहे.










