- कोटीपेक्षा अधिकच्या किमतीची वाहने जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२१) :- चारचाकी वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवत त्याचा करार करून परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून एक कोटी २० लाख २० हजार रुपयांची १६ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी सुनील नामदेव राखपसरे (रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात १९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्पेश अनिल पंगेकर (वय ३३, रा. नवी खडकी, येरवडा), नमण सहाणी (वय ३९, रा. लोहगाव, पुणे), सनी भाऊसाहेब कांबळे (वय २७, रा. खडकी), संदीप ज्ञानेश्वर गुंजाळ (वय ३७), हितेश ईश्वर चंडालीया (वय २७), रोनित मधुकर कदम (वय २८, तिघेही रा. येरवडा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.