- ४५ वयावरील लाभार्थींना ‘कोव्हॉक्सीन’ व ‘कोविशिल्ड’चा डोसही नियमित..
- पालिकेच्या लसीकरण केंद्रावर सकाळी नऊ वाजता टोकन वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका वय वर्षे १८ ते ४४ लाभार्थींना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा डोस देणार आहे. दुसरा डोस हा फक्त पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना उद्या गुरुवारी (दि. ३) रोजी दिला जाणार आहे.
पालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, अहिल्याबाई होळकर, सांगवी मनपा शाळा, नवीन जिजामाता रुग्णालय या केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येणार आहे.
तसेच वय वर्षे ४५ वरील लाभार्थींना ‘कोव्हॉक्सीन’चा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थींच्या क्षमतेने महापालिकेच्या कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णा लयाजवळ, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
उद्या (दि. ०३) रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने हा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ५१ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर (दि.०३) रोजी सकाळी ९.०० वाजल्यानंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

















