- तरुणाची निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्री कामावरून सुटल्यानंतर फिर्यादी जात होते. त्यावेळी आरोपीने दारू पिऊन फिर्यादीकडे माचिस मागितले. त्यावर आपल्याकडे माचीस नसल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. यावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तसेच तुझ्याकडे माचिस नाहीतर तू आमच्या एरियात का आला, असे म्हणून ढकलून दिले. माचिस न दिल्याच्या रागातून आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात दगड घातला. तसेच लाकडी दांडक्याने पायावर मारून जखमी केले. आरोपीने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून फिर्यादी यांना दगडाने, लाकडी दांड्याने मारून गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
हिमांशू मुन्नालाल गुप्ता (वय २९, रा. चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजवंश राजमंदरसिंग दुधानी, अभिषेक बनसोडे (दोघे रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) आणि त्यांच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.