- एकजण जखमी; सांगवी पोलीसांचा कसून तपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- सांगवी पोलीस चौकीचे दोन पोलीस कर्मचारी रात्री गस्तीवर होते. घोलप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरवारी पहाटे चारच्या सुमारास काही जण अंधारात संशयितरित्या वावरत असल्याचे त्यांना दिसून आले.
त्यामुळे त्यांनी वाहन थांबवून आवाज देत त्यांना हटकले. त्यावेळी अज्ञात संशयितांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यात एकजण जखमी झाले. तसेच, पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले. पोलीस नाईक अमोल लावंड, असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.