न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसें.) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी (दि. २८) रोजी पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. दोन उपायुक्त, पाच पोलीस निरीक्षक, तसेच दोन सहायक निरीक्षक आणि एका फौजदाराची बदली केली.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ – २) नम्रता पाटील यांची बदली मुख्यालयात तर, त्यांच्या जागी मुख्यालयातील उपायुक्त विनायक ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.
निगडीचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप लोंढे यांची बदली चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी तर त्यांच्या जागी देहूरोडचे निरीक्षक (गुन्हे) अमरनाथ वाघमोडे यांना पाठविण्यात आले आहे. सांगवीचे निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांची बदली नियंत्रण कक्षात झाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक योगेश आव्हाड यांची बदली विशेष शाखेत, सांगवीचे सहायक निरीक्षक खताळ यांची बदली दिघी पोलीस ठाण्यात तर सांगवीचे फौजदार महेंद्र आहेर यांची बदली हिंजवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.