- एकाच्या डोक्यात कोयता घालून केले गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जून. २०२१) :- पिंपरीतील बौद्ध नगर येथे फिर्यादीचा मित्र हा दुकानात खरेदी करीत असताना फिर्यादी दुकानाच्या बाहेर थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आला. तू माझ्याकडे का पाहत आहेस, मी कोण आहे तुला माहित नाही का, असे आरोपी म्हणाला.
त्याच्या सोबत असलेल्या आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुख्य आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले. गुरुवारी (दि. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
ऋषिकेश गणेश बालगुडे (वय २१, रा. रिव्हर रोड, पिंपरी), असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून शुक्रवारी (दि. ४) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश राम (वय २१), कुणाल कदम (वय २३), दाद्या दीपक कदम (वय २१, तिघेही रा. बौद्धनगर पिंपरी) व इतर दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

















