- मामच्या मांडीवर घातला तलवारीने घाव; चिखलीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जून. २०२१) :- फिर्यादी हे गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्या वेळी त्यांचा भाचा आरोपी हा तिथे आला.
‘तू ब्रम्हा विष्णू महेश संघामधून कबड्डी खेळू नको, तू आमच्या ओमसाई कबड्डी संघामधून खेळ. नाहीतर मी तुला कबड्डी खेळण्याच्या लायक सोडणार नाही’ अशी धमकी देत, आरोपीने फिर्यादी यांच्या मांडीवर तलवारीने वार केले. तसेच दगडाने डाव्या पायाच्या नडगीवर मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. ३) सकाळी चिखलीगाव येथे घडली.
संतोष बाळासाहेब मोरे (वय ३४, रा. चिखली गाव) असे जखमी मामाचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भाचा राहुल यादव, सोन्या नेवाळे, गौरव गावडे (सर्व रा. चिखली) आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

















