- मात्र. ५० टक्केच उपस्थितीचे बंधन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० टक्के क्षमतेने सभेचे कामकाज करण्याची अट घालण्यात आली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनीही आदेश पारित केले आहेत.
महापालिकेला राज्य सरकारचे पत्र प्राप्त झाले असून, त्यामध्ये ५० टक्के क्षमतेने प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जूनची सभा प्रत्यक्षात सभागृहातून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.