- नियुक्तीनिमित्त ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२१) :- मोरवाडी न्यायालयात पी. सी. फटाले यांची न्यायाधीश म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. त्यानिमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ, सदस्य अॅड प्राची शितोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ए. यू. सुपेकर, डी. आर. पठाण, आर. आर. काळे, एन. टी. भोसले, माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. विलास कुटे, अॅड. सुनील कडुसकर, अॅड. दिनकर बारणे, महाराष्ट्र आणि गोवा शिस्तपालन समिती सदस्य अॅड. अतिश लांडगे, अॅड. प्रताप कडूस व इतर वकील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन उपध्याक्ष अॅड. पांडुरंग शिनगारे, सचिव अॅड. महेश टेमगिरे, सह सचिव अॅड. अनिल शिंदे, खजिनदार अॅड. हरिष भोसुरे, ऑडिटर अॅड. धनजय कोकणे, सदस्य अॅड. ऋतुराज आल्हाट, अॅड. मंगेश नढे, अॅड. कृष्णा वाघमारे यांनी केले. अॅड. महेश टेमगिरे यांनी आभार मानले.