न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून लोकांकडून पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पालिकेचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी पोमण यांनी पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. तसेच या खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठविली असल्याचा प्रकार घडला. त्यानंतर हे खाते बंद करण्यात आले आहे. पोलिसांनी याबाबत फेसबुककडून माहिती मागविली आहे. त्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.