- शहर भाजपा युवा मोर्चाची महापौर व आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील गरीब विद्यार्थ्यांना पालिकेने ऑनलाईन शिक्षणाकरिता लागणाऱ्या मोबाईल रिचार्जसाठी आर्थिक मदत करावी, अशा मागणीचे निवेदन शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस तथा स्वीकृत सदस्य दिनेश यादव, सरचिटणीस जवाहर ढोरे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनामुळे बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाकीची झालेली आहे. सर्वच शाळा ऑनलाईन क्लास घेत आहेत. त्यामुळे पालकांना परिस्थिती नसतांना विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन देत रिचार्ज करून द्यावे लागत आहे. बरेचशा विद्यार्थ्यांना तर तेही शक्य नसल्यामुळे ते शिक्षणापासुन वंचित राहत आहेत. अशा वंचित विद्यार्थ्यांना पालिकेतर्फे मदत देऊन हातभार लावावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
















