- दोन महिलांची सुटका; एका आरोपीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- काळेवाडी फाटा, गजानननगर येथे आरोपींनी दोन महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांना पैशांचे आमिष दाखवून स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारला.
या कारवाईमध्ये ११ हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत दोन महिलांची सुटका केली. तर एका आरोपीला अटक केली असून दुसर्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १०) दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्पा मॅनेजर अनिल अरुण जेना (वय २६, रा. गुजरनगर, थेरगाव), स्पा मालक गणेश कदम (रा. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















