- गुन्हेगारांचा अड्डा असणारी पानटपरी पोलिसांकडून उध्वस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून २०२१) :- भाजी विक्रेत्यांचे टेम्पो फोडल्यानंतर पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपींची पानटपरी उखडून फेकली. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. ११) ही कारवाई केली.
भाजी विक्रेत्यांनी हप्ता न दिल्याने आरोपींनी त्यांच्या तेरा टेम्पोची तोडफोड केली. घटनेनंतर काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपींना यांना बेड्या ठोकल्या. चौकशीत आरोपी चंद्रकांत गायकवाड याची म्हातोबानगर येथे अनधिकृत पानटपरी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपायुक्त भोईटे यांनी स्वतः टपरीची पाहणी केली. त्या वेळी दररोज रात्री या पानटपरीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण जमा होत असल्याचे नागरिकांनी त्यांना सांगितले.
भोईटे यांनी लगेचच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याशी टपरी हटवण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या पथकाने टपरी उखडून फेकली.