- पुणे व पिंपरी चिंचवड शहरात २१ केंद्रावर पासची सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून २०२१) :- पीएमपीची पन्नास टक्के प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मासिक पासचा लाभ व्हावा याकरिता मंगळवारी (दि.८) पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील २१ केंद्रावर पास देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
दोन्ही शहरात सुमारे ४०० बस धावत आहेत. अनलॉक नंतर सुरू करण्यात आलेल्या पीएमपी सेवेचा फायदा नोकरदार कामगारांसह इतरांना व्हावा यासाठी पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील २१ पासकेंद्र मंगळवारी सुरू करण्यात आली.
भोसरी, चिंचवडगाव, निगडी, पिंपळे गुरव, पिंपरी रोड चौक व पुण्यातील आदी ठिकाणी नागरिक महिन्याचा पास काढू शकतात. हे पास केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहील. भोसरीतील पास केंद्र दुपार पाळीत २ ते ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.