न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असणाऱ्या व वय वर्ष १८ ते ४४ वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात येत आहे.
त्यासाठी आवश्यक वैध पुराव्यानिशी परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation latter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.) या कागदपत्रांच्या पुराव्यासह महापालिकेच्या ‘मी जबाबदार या ‘अॅप’वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
‘मी जबाबदार’ ‘अॅप’वर नोंदणी केलेल्या लाभार्थींनी लसीकरण करण्यासाठी दि. १२ जून २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात सकाळी १० ते ५ या वेळेत उपस्थित राहणे अपेक्षित आहे. ज्या लाभार्थ्यांनी मी जबाबदार ‘अॅ’पवर नोंदणी केलेली नाही अथवा एसएमएस प्राप्त नाहीत अशांचा विचार करण्यात येणार नाही.
लाभार्थ्यांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘मी जबाबदार’ या ‘अॅप’ वर दर गुरुवार ते बुधवार पर्यंत नोंदणी चालू राहिल. या कालावधीत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचे आठवडयातील दर शनिवारी नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे, असे पालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.