- सहा जणांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून २०२१) :- भोसरीतील शास्री चौक परिसरात विसावा हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत फिर्यादी यांचा ट्रक (एमएच १४ / व्ही ०५९२) हा पार्क केला होता. या ट्रकच्या काचा आरोपींनी फोडल्या. तसेच, एकाच्या मालकीच्या कारच्याही (एमएच १४ / एच क्यू २४२१) काचा फोडून नुकसान केले आहे.
ही घटना गुरूवारी (दि.१०) हा प्रकार घडला. वैजनाथ सदाशिव आडागळे (वय ५२, रा. पारिजात कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी शुक्रवारी (दि.११) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरमान देशमुख, सनी चिवे (दोघेही रा. कासारवाडी) व इतर चार अनोळखी तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















