न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या रविवार दि.१३ जून २०२१ रोजी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम आज दि.१२ जून २०२१ रोजी नवीन जिजामाता रुग्णालयात राबविण्यात आली. २२९ लाभार्थ्यांपैकी प्रत्यक्ष लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर ६४ लाभार्थी उपस्थित होते. यामधील २१ लाभार्थी अपात्र होते व पात्र ४३ लाभार्थ्यांना आज लसीकरण करण्यात आलेले आहे.
तसेच आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये २४४ लभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.


















