न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. जून. २०२१) :- भोसरीतील भाजप पदाधिकारी व काही माजी शिवसैनिकांनी शनिवारी (दि. १२ जून) रोजी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणा-या महानगरपालिकांच्या निवडणूकीपुर्वी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश होतील त्याची ही नांदी आहे. यामुळे भोसरी विधानसभेत शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख ॲड. सचिन भोसले, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांच्या उपस्थितीत भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवबंधन बांधले.
यावेळी शैलेश उर्फ तुकाराम निवृत्ती मोरे, सुनिल भागुजी वाटे, श्रीकांत चन्नाप्पा करोली, बाबासाहेब गोविंद काळोखे, संदिप राघू चव्हाण, बटू काशीनाथ पाटील, किशोर अशोक शिनगारे, अशोक अश्रुबा चव्हाण, भारत एकनाथ नरवडे, संजय कृष्णा पाटील आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.


















