- क्षणभर कोरोनाचा विसर? पोलिसांची वाढली डोकेदुखी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. जून. २०२१) :- साप्ताहिक सुट्टी असल्याने नागरिकांनी करोनाचं भान न बाळगता लोणावळा आणि भूशी डॅम परिसरात गर्दी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नियमांचं उल्लंघन करून लोक लोणावळा आणि भूशी डॅम परिसरात जाण्याचा प्रयत्न करत होते. सकाळ पासूनच हजारो पर्यटक हे लोणावळ्यातील भुशी धरणाऱ्या दिशने जात असताना लोणावळा पोलिसांनी आवाहन, विनंती करून परत पाठवले.
पर्यटनस्थळच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वाहतूक कोंडी झाली. लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले.


















