न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. जून. २०२१) :- इसमाने निगडीतील दुर्गादेवी टेकडीवर जाऊन एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.
समाधान शहाजी सरडे (वय ३५, रा. त्रिवेणीनगर, निगडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.


















